- Tubelator AI
- >
- Videos
- >
- Entertainment
- >
- Aalasavar Mat Kara | part 6 | marathi audio book | motivational video | book in marathi | new video
Aalasavar Mat Kara | part 6 | marathi audio book | motivational video | book in marathi | new video
Video Summary & Chapters
No chapters for this video generated yet.
Video Transcript
प्रकरण सहा आळशी नरकात राहतो माणसास सतत
कार्य हवे सतत हालचाल करणे हा माणसाचा
स्वभाव आहे एखाद्या सतत कार्य करत
असलेल्या माणसाला सांगितले स्वस्थ बस काही
करू नकोस तर त्यालाही शिक्षाच वाटेल आळशी
माणूस उपयुक्त काम करीत नाहीच मानवी
शरीराला सतत कार्य हवे असते
शरीराच्या अवयवांना काम दिले नाही तर
त्याला मृत्यूच येणार हिमालयात काही साधू
त्यांच्या मते तपश्चर्या
करतात म्हणजे एक हात सतत उंच करून उभे
राहतात त्या हाताचा काहीच वापर न
केल्यामुळे दोन-चार महिन्यातच तो हात
लाकडासारखा वाळून जातो व अजिबात हलत नाही
त्या हाताचा उपयोगच नसतो आळशी माणसाला
सुद्धा कोणता तरी उद्योग हवा असतो पण
आळसाचा उद्योग फलदायी कधीच नसतो आळशी
माणसाचा एक नमुना असाच एक आळशी मनुष्य
माझ्या माहितीचा आहे 38 वर्षाच्या
आयुष्यात त्याने कसलेच काम केले नाही
जेवायला बसल्यावर त्याला पाणी पिण्याचे
भांडे आणून द्यावे लागते तरच तो पाणी पितो
त्याचे आई-वडील निवृत्त प्राध्यापक आहेत
तो त्यांचा एकुलता एक पुत्र आहे त्याने
वेळ घालवण्यासाठी एक उत्तम युक्ती काढली
आहे त्याचे पिताजी त्याला मध्य रेल्वे आणि
पश्चिम रेल्वेचे पास काढून देतात तो सकाळी
नऊ वाजता घरातून निघतो आणि दिवसभर
निरनिराळ्या लोकलनी प्रवास करीत राहतो या
प्रवासात त्याचा वेळ चांगला जातो
लोकलच्या प्रवासाने तो चांगलाच दमतो आणि
दमून भागून सायंकाळी घरी येतो आई-वडील जर
त्याला म्हणाले आज घरी पाहुणे येणार आहेत
तर आजचा दिवस प्रवासाला जाऊ नकोस तर तो
ऐकत नाही तो म्हणतो की मला प्रवासाला
गेलेच पाहिजे घरी थांबणे मला जमणार नाही
आळशी मनुष्याचे वर्तन हे असे असते आळसाचा
जन्म निराशेत तुम्हाला आळशी व्हायचे नसेल
तर मनाला निराशेस प्रवेश देऊ नका कारण
निराशेतून अनेकदा आळसाचा जन्म होतो माझ्या
हातून काही जमणार नाही असे ज्या माणसाला
वाटते तो आळशी झालाच म्हणून समजा आळशीपणा
हा एक शापच आहे आळशीपणाचा शाप ज्याला
मिळाला तो या पृथ्वीवरच नरक निर्माण करतो
आणि त्या नरकातच राहू लागतो भिकेचे विविध
प्रकार जो काहीच काम करत नाही त्याला
शेवटी भीकच मागावी लागते आपण जे भिकारी
पाहतो ते काही जन्मतः भिकारी नसतात कारण
त्यांना आई-बापांनी जन्म दिलेला असतो पण
आळशीपणाच्या दुर्गुणामुळेच त्यांना भीक